रक्षाबंधनानिमित्त पोस्टाची रात्री उशिरापर्यंत बुकिंग सुविधा


 

यवतमाळ दि.७ : येणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित राखी, भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगमध्ये होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, नागरिकांच्या सोयीसाठी 'यवतमाळ रेल डाक सेवा सॉर्टिग काउंटर' यवतमाळ मुख्य डाक घर बिल्डींग येथे रात्री उशिरापर्यंत बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त राखीचे पार्सल वेळेवर रवाना आणि वितरित करता यावेत, यासाठी यवतमाळ रेल डाक सेवा सॉटिंग काउंटर दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळे, ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतरही आपले पार्सल सोयीस्करपणे बुक करता येतील.

या रात्री उशिरापर्यंतच्या बुकिंग काउंटरवर स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा इत्यादी टपाल सेवा उपलब्ध असणार आहे.

नागरिकांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा आणि भारतभर तसेच परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी, भेटवस्तू, मिठाई आणि सणासुदीच्या इतर वस्तू वेळेवर पोहोचवण्यासाठी त्या आधीच बुक कराव्यात, असे आवाहन रेल डाक सेवा नागपूरचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

वितरण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर होण्यासाठी, ग्राहकांनी वस्तूंचे योग्य पॅकिंग करावे, पूर्ण टपाल पत्ता व अचूक पिन कोड नमूद करावा आणि प्राप्तकर्त्याचा मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या प्रियजनांना राखी, भेटवस्तू आणि सणांच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी रेल डाक सेवा विभागाच्या विश्वसनीय टपाल सेवांचा लाभ घ्यावा. तसेच क्युआर कोड स्कॅन करुन अधिक माहिती मिळवावी, असे आवाहन रेल डाक सेवा यवतमाळद्वारे करण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान