मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

यवतमाळ दि.७ : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात येतात. या योजनेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यासाठी वसतीगृह प्रवेश प्रणाली कार्यन्वित करण्यात आलेली आहे.

मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ५, इमाव प्रवर्गाच्या ३, विमाप्र प्रवर्गाच्या २, दिव्यांग प्रवर्गाच्या ३, अनाथ प्रवर्गाची १ व आर्थिक मागास प्रवर्गाच्या ३ अशा एकूण १७ जागा रिक्त आहेत. तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ३, इमाव प्रवर्गाच्या ५, विमाप्र प्रवर्गाच्या ०, दिव्यांग प्रवर्गाची १, अनाथ प्रवर्गाची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण ११ जागा रिक्त आहेत.

मुलींचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ येथील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाच्या ७, इमाव प्रवर्गाच्या १०, विमाप्र प्रवर्गाच्या ३, दिव्यांगच्या ३, अनाथची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण २५ जागा रिक्त आहेत, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता विजाभज प्रवर्गाची १, इमाव प्रवर्गाच्या २, विमाप्र प्रवर्गाच्या ०, दिव्यांगची १, अनाथची १ व आर्थिक मागास प्रवर्गाची १ अशा एकूण ६ जागा रिक्त आहेत.

जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना १२ वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज दि. ७ ते ३१ ऑगस्टपर्यंत करावा लागणार आहे.

अर्ज छाननी करण्याचा कालावधी दि. १ ते ७ सप्टेंबर असून दि. ८ सप्टेंबर रोजी पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम व प्रसिध्द करणार आहे. पहिल्या निवड यादी नुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. १८ सप्टेंबर असुन रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी दि. २९ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत राहील.

वसतिगृहामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याकरीता https://hmasnew.mahait.org  या संकेत स्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच या योजनेकरीता प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधीचा ३१ ऑगस्टपर्यंत राहील, असे आवाहन  इतर मागास बहुजन कल्याण विभागचे सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान