कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांचा जिल्हा दौरा
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिशनसंबंधित जिल्हास्तरीय आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत शेतकरी आत्महत्या प्रकरणे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रेरणा प्रकल्प, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, महिला बचज गट, क्रीडांगणे, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, खरीप कर्जवाटप, पशुसंवर्धन, जलसंधारण इत्यादी विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment