पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 'आपलं कर्ज माफ झालं' जनजागृती गीताचे लोकार्पण

 


यवतमाळ, दि. 13 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आपलं कर्ज माफ झालं या जनजागृती गीताचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची माहिती सहज आणि प्रभावीपणे मिळावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे गीत तयार करण्यात आले आहे. गीताच्या माध्यमातून योजनेचा संदेश अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती गीताची निर्मिती करण्यात आली आहे. याची संकल्पना निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांची असून, दिग्दर्शन उपजिल्हाधिकारी राहुल तायडे यांनी केले आहे.

 गीत-संगीत आणि गायन मुकुंद नितोणे यांनी केले असून, गायिका कविता वर्घट यांनी सहभाग नोंदविला आहे. ध्वनीमुद्रण व संकलनाची जबाबदारी विश्वास साठे यांनी सांभाळली आहे.

आपलं कर्ज माफ झालं या गीतातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासोबतच शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेची माहिती घेऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, गायक मुकुंद नितोणे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान