माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी पंतप्रधान शिष्टवृत्ती योजना

 

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

यवतमाळ, दि. 10 (जिमाका):  केंद्र सरकारने माजी सैनिक किंवा विधवांच्या पाल्यांना इयत्ता बारावी व पदवीनंतरचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी, पदविका आणि पदवी परीक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या व पुढे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जसे बीई, बीटेक, एमबीबीएस, बीडीएस, वेटरनरी, एमबीए, बी फॉर्म, बीबीए, बीएड, एमसीए माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती मिळण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाने अर्ज मागविले आहेत.

या शिष्यवृत्तीसाठी सैनिक कल्याण विभाग पुणे यांचेकडे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. तत्पुर्वी पात्र व इच्छुक माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी ऑनलाईन केंद्रीय सैनिक बोर्डाच्या www.ksb.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान