शासकीय वसतिगृह न मिळाल्यास स्वाधार योजनेचा लाभ ; विद्यार्थ्याना वसतिगृहासाठी ॲानलाईन अर्ज अनिवार्य
यवतमाळ दि.७ :अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ११ वी १२ वी त्यापुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासुन स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रथम समाज कल्याण विभागातंर्गत येणारे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तेव्हा सन २०२६-२७ मध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दि. ७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य असल्याने यासाठी विभागाच्या संकेस्थळावर http://hmasnew.mahait.org अर्ज प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे.
तसेच नवीन नियमानुसार शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करण्याऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह तसेच स्वाधार योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र राहणार आहे.
सर्व गरजु विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत कालावधीत शासकीय वसतिगृहा करीता ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य आहे. प्रवेशाबाबतचे अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment