िल्टर प्लॉंटमधील तांत्रिक बिघाडामुळे शहरात पिवळसर पाणी पुरवठा पाणी वापरण्यास योग्य; पाणी उकळुन पिण्याचे आवाहन

फ यवतमाळ दि. ४ : यवतमाळ पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीअंतर्गत येणाऱ्या फिल्टर प्लॉंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने यवतमाळ शहरामध्ये सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा पिवळसर आहे. हे पाणी वापरण्यासाठी योग्य आहे. मात्र नागरिकांनी पिण्यासाठी पाणी उकळुन प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. या फिल्टर प्लॉंटचे २ ते ४ दिवसांत काम झाल्यावर शुध्द पाणी पुरवठा करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अधिकारी संजय उमाळे यांनी दिली आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान