7 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे,
सेवा, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती
न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे पत्र स्वीकारण्यात येणार नाही. वैयक्तिक
स्वरुपाची तक्रार, निवेदन सादर करुन नये.
महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात
येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर
करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच
जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार
नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी
यांनी केले आहे
Comments
Post a Comment