मराठी भाषा विभाग व अधिनस्त कार्यालयांचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित

     यवतमाळ, दि.17 (जिमाका) : मराठी भाषा विभाग व अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यासह एकूण सात संकेतस्थळांचे महाआयटीमार्फत हस्तांतरण करण्याची कार्यवाही दरम्यान सुरू होती. या हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान सर्व सात संकेतस्थळांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार maharashtra.gov.in   हे डोमेन वापरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. 

            या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्यामुळे संबंधित सात संकेतस्थळे तात्पुरती अनुपलब्ध होती. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने सर्व पूर्व संकेतस्थळे नव्या संकेतस्थळांवर नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत . 

   त्यानुसार मराठी भाषा विभागाचे नवीन संकेतस्थळ https://marathi.maharashtra.gov.in, भाषा संचालनालय कार्यालयाचे नवीन संकेतस्थळ https://directorate-marathi.maharashtra.gov.in, राज्य मराठी विकास संस्थेचे https://rmvs-marathi.maharashtra.gov.in, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे  https://sahitya-marathi.maharashtra.gov.in , महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे https://marathivishwakosh.maharashtra.gov.in, विश्वकोश प्रथमावृत्तीचे (१ ते २० खंड) https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in, मराठी परिभाषा कोशचे नवीन संकेतस्थळ https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in ही नवीन संकेतस्थळ  कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यिक, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी- कर्मचारी तसेच सर्व संबंधितांनी या नव्या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवहन असे मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान