स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज नुतनीकरणाची संधी

 

१५ सप्टेंबरपर्यंत मुदत

यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी संधी दकेण्यात आली असून त्यासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ सन २०२५-२६ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नुतनीकरण अर्ज भरलेले होते व सदर अर्ज समाज कल्याण विभागाकडून मंजूर  झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाकडून अर्ज नुतनीकरणासाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी http://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नुतनीकरण करणे आवश्यक आहे.

अर्ज नुतनीकरण करताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी, म्हणजेच १५ सप्टेंबरपूर्वी, संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अंतिम मुदतीनंतर विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विहित मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्जाचे नुतनीकरण केले नाही, तर संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी इच्छुक नाही, असे गृहीत धरुन त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अंतिम मुदतीनंतर अर्ज नुतनीकरणासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी http://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर लॉगीन करुन १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपला अर्ज ऑनलाइनरित्या भरावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित