मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांचे ऑनलाईन क्लस्टर; ६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. ४ : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी मतदारसंघ निहाय प्राप्त न्युनत्तम दर व कंत्राटदारांच्या सुचीला (पॅनल) जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार यवतमाळ विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्याचे ऑनलाईन क्लस्टर तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बेचखेडा गावातील गावठाण गट १५५ ते १८४ रूई, गट १५४ ते गट २२५ व गांवठाण ते रामनगर रोड हा क्लस्टर तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी सुमारे २० लाख रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली असून यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील पात्र कंत्राटधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बेचखेडा गावातील या पाणंद रस्त्याचे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कंत्राटधारकांनी आपले अर्ज दि. ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपविभागीय कार्यालय यवतमाळ येथे सादर करावे, असे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित