महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपट्टी देयकाच्या दरात वाढ ;
नवीन दर लागू
यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपट्टी
देयकाच्या दरात वाढ करण्यात आली असून, नवीन दर २९ मे २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत.
ग्राहकांचा प्रकार व पाण्याच्या वापरानुसार हे पाणी दर लागु करण्यात आले आहेत.
घरगुती नळजोडणी धारकांसाठी प्रतिमाह १५ हजार लिटरपर्यंत पाणी वापरासाठीचा दर
२२.९९ रुपये प्रति एक हजार लिटर, तर १५,००१ ते २५ हजार लिटरपर्यंत पाणी वापरासाठीचा
३५.४५ रुपये प्रति एक हजार लिटर तसेच २५,००१ लिटरपासून अधिक पाणी वापरासाठीचा दर ४८.२८
रुपये प्रति एक हजार लिटर असा दर लागू करण्यात आला आहे.
बिगर घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट प्रतिमाह १०६.३६ रुपये, तर ना-नफा-ना-तोटा
तत्त्वावर असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट प्रतिमाह ४४.२९ रुपये असा सुधारित दर
लागु करण्यात आला आहे.
या नवीन पाणी दरांची माहिती पाणी देयकावरही नमूद करण्यात आली
आहे. त्यामुळे सर्व नळधारक ग्राहकांनी सुधारित दरांची नोंद घ्यावी आणि पाणी देयकाचा
नियमित भरणा करुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन यवतमाळ मजीप्राच्या
जल व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संजय आर. उमाळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment