नागरिकांना औषध पुरवठ्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

• औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार दि. २० मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित व सुरळीत उपलब्ध राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासन सतर्क असून हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून नागरीकांनी संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त गजानन घिरके यांनी केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना अखंडित औषध पुरवठा राहावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने केमिस्ट संघटनांसोबत समन्वय साधला आहे. सह आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी संपर्क साधण्यात आला असून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ कार्यालय हेल्पलाईन क्रमांक औषध निरीक्षक मनिष गोतमारे,9552574494,वरिष्ठ लिपीक रा.गो. पवार 9764300940, रोखपाल गो. ना. शेखापुरे 9766573460,सहायक आयुक्त औषधे गजानन धिरके 9850150687 तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पलाईन क्रमांक संजय पिंपळखुटे यवतमाळ 8308834284, पंकज नानवाणी यवतमाळ 9423812345, संजय बुरले यवतमाळ 9422165550, राजकुमार कोटलवार पुसद 9922167300, नितीन उत्तलवार पांढरकवडा 9422560078, अरविंद देशमुख उमरखेड 9422560078, सुनिल हरसुलकर दिग्रस 8275739476,रविंद्र येरणे वणी 9881156095,संदिप आदूंरे आर्णी 8888109990,अनिल खोडे बाभूळगाव 9423266788, संतोष वर्मा सवर 9423266788, निलम सिंगी दारव्हा 9423134177,इद्रिस डोसानी दिग्रस 9422169306,रवि बेलोरकर घाटंजी 9404826865,दिलीप कोठारी कळंब 9420116234, ज्ञानचंद बोगावत पांढरकवाडा7020835683,जयंत चौधरी महागांव 9420061194,दुष्यंत जयस्वाल मारेगांव 9423266797,हर्षद कोचेटा नेर 7020185681,रविंद्र पदमवार पुसद 8275399778,आनंद तूरणकर राळेगांव 8237176515,अ जीज खान उमरखेड 9403457181,लक्ष्मण उरकुडे वणी 9372488432, मुजिब शेख झरीजामणी 9763815111 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त गजानन घिरके यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती