आदर्श आचारसंहितेमुळे रोजगार महाकुंभ स्थगित
यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत 2० रोजगार मेळावे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत.
राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हचे
आयोजन करण्यात आले होते.
रोजगार मेळाव्यांच्या
पुढील आयोजनाबाबतची माहिती संबंधित संस्था व उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. उमेदवार, नियोक्ते, प्रशिक्षण
संस्था तसेच नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, चौथा मजला, दारव्हा रोड,
यवतमाळ. दूरध्वनी : ०७२३२-२४४३९५ ई-मेल : yavatmalrojgar@gmail.com वेबसाईट :
rojgar.mahaswayam.in
Comments
Post a Comment