यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

 

यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी  ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीमध्ये नवीन नाव नोंदविणे, मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करणे तसेच अपात्र मतदारांचे नाव वगळण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी दि. १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी ७८- यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या विशेष शिबिरांमध्ये पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव व इतर तपशीला -मध्ये दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार नाव वगळणीसाठी अर्ज सादर करावा.

७८- यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, तसेच आपल्या कुटुंबातील पात्र सदस्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. असे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, गोपाळ देशपांडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित