एचआयव्ही आणि इतर आजाराबद्दल जागरूकता शिबीर संपन्न
यवतमाळ, दि. 25 (जिमाका) : "एचआयव्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणाऱ्या आजराबद्दल रूग्णांसाठी जागरूकता" शिबीराचे दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता ए.आर.टी. सेंटर, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, यवतमाळ येथे जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण भोजने तर प्रमुख उपस्थीती म्हणुन डॉ. वैद्यकिय अधिकारी मिनल राशतवार होते. तर प्रमुख वक्ते मार्गदर्शक, ए.आर.टी. समुपदेशक नितिन फुलझेले व मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी हे होते.
कार्यक्रमाचे वक्ते नितिन फुलझेले यांनी एचआयव्ही एड्स हा आजार असाध्य जरी असला तरी त्या आजारासह पुर्ण आयुष्य आपण व्यतित करू शकतो. त्याकरीता रूग्णांनी आपल्या दैनंदिन गरजाविषयी व आरोग्याबाबत जागृत राहुन वैयक्तीक काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोषक आहार आणि सकारात्मक जिवनशैली आणि औषधोपचाराने नियमित तपासणीमुळे व्यक्ती समाधानकारक जिवन जगु शकतो याबाबत विस्तृत माहिती दिली.
त्यानंतर मुख्य लोकअभिरक्षक स्वप्नील कुलकर्णी, यांनी आपले भाषणामध्ये सांगितले की, भारतामध्ये एचआयव्ही, एड्सविषयी दिर्घकाळ आरोग्यविषयक दृष्टिकोनातुन चर्चा होत आली. मात्र एचआयव्ही असलेल्या व्यक्तींना रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा, निवास, विमा, सामाजिक संबंध किंवा इतर क्षेत्रांमध्ये भेदभावाचा सामना करावा लागु शकतो म्हणुन एचआयव्ही व एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 2017 बनविण्यात आल्याचे सांगितले. या अधिनियमाच्या कलम 23 ते 28 मध्ये लोकपाल संबंधीत तरतुदी असल्याचे सांगितले. कलम 24 नुसार लोकपालाला अधिनियमातील भेदभावाच्या कृत्यांबाबत तसेच आरोग्यसेवा पुरविण्याशी संबंधित उल्लंघनांबाबत चौकशी करण्याचा अधिकार असुन कलम २६ नुसार सामान्यतः तकार प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांच्या आत, पक्षकारांना सुनावणीची संधी देवून, कारणांसह आदेश देणे अपेक्षित आहे. तसेच एचआयव्ही बाधित महिलांना कौटुंबिक हिंसाचार तसेच मालमत्तेतुन हाकलुन दिल्यास तिला मोफत विधी सेवेमार्फत दाद कशी मागता येईल याबाबत माहिती दिली.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण भोजने, यांनी २०१७ या कायद्यातंर्गत भेदभाव करता येत नाही. जर एखादी व्यक्ती शासकिय अथवा खाजगी नोकरीवर असेल तर त्याला या आजाराच्या कारणावरून कमी करता येत नाही. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या योजनेसंदर्भात माहिती दिली तसेच विविध योजनांची माहिती देवून व भावी जिवनासाठी रूग्णांना शुभेच्छा दिल्या.
000
Comments
Post a Comment