लिकेज दुरुस्तीचे कामामुळे काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार

 


यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती अंतर्गत वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी झोन अंतर्गत मुख्य पाणी पुरवठा करणारी ७०० मी.मी. व्यासाची डी.आय. के-९ पाईपलाईनवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळचे गेट समोर लिकेज झाल्याने हा लिकेज दुरुस्तीचे काम दि.22 ते दि.23 सप्टेंबर 2026 पर्यंत करणार असल्याने वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी अंतर्गत 9 उंच पाण्याच्या टाकीवरुन वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्नीक, चांदोरे नगर टाकी उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा दोन दिवस पुर्णपणे बंद राहील. तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व प्राधिकरणास सहकार्य करावे, असे उपविभागीय अधिकारी संजय उमाळे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित