29 सप्टेंबर रोजी शौर्यदिन समारोह व माजी सैनिक मेळावा
यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अध्यक्षतेत शौर्यदिन समारोह तसेच माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यामध्ये युध्दविधवांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक, कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment