जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा

 

यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सध्या उपलब्ध असलेल्या वाहनाचे कंत्राट संपुष्टात आल्याने नवीन वाहन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार वातानुकूलित टॅक्सी परवाना असलेले इनोव्हा हायक्रॉस/हायब्रिड व्हीएक्स ७ एस मॉडेल प्रकारातील वाहन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे.

वाहन भाड्याने घेण्यासंदर्भातील इतर अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुक वाहनधारकांनी १७ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयात सिलबंद लिफाफ्यात निविदा सादर करावी.

प्राप्त सिलबंद निविदा २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात येणार आहेत. इच्छुक वाहनधारकांनी निर्धारित मुदतीत निविदा सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित