महाडीबीटी 2.0 नवीन पोर्टलविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बाबाजी दाते महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर
राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांबाबत माहिती देण्यासाठी बाबाजी दाते कला
व वाणिज्य महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सन २०२६-२७ मध्ये महाडीबीटी
2.0 हे नवीन पोर्टल कार्यान्वित
करण्यात आले असून, या पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे,
अर्जातील त्रुटींची पूर्तता व अर्जाची सद्य:स्थिती तपासण्याबाबत प्रकल्प अधिकारी राहुल
कराळे व तालुका समन्वयक सुदर्शन चंद्रवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू, प्राध्यापक नितेश गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी
उपस्थित होते. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्तीचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण
सहायक आयुक्त यांनी केले आहे.
Comments
Post a Comment