गणेशोत्सवात
खास डाक विभागाद्वारे रात्र शिबिराचे आयोजन
यवतमाळ,
दि. 17 (जिमाका) : भारतीय डाक विभाग
दिवसेंदिवस जनताभिमुख उपक्रम राबवत असून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील
आहे. डाक घरामार्फत विविध बचत योजना राबविण्यात येत असून आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक
समावेशन या केंद्र सरकारच्या धोरणाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी डाक विभागाचे
कर्मचारी विशेष शिबिराचे आयोजन करत आहेत.
डाक विभागातर्फे
बचत खाते, आवर्ती खाते, सुकन्या समृद्धी योजना, मुदतीचे खाते, किसान विकास पत्र, राष्ट्रीय
बचत पत्र, वरिष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, पीपीएफ आणि डाक जीवन विमा
अशा विविध बचत योजना राबविण्यात येते. सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्या साठी जनतेची
पसंती दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या सगळीकडे
गणेशोत्सव सुरु आहे आणि या दरम्यान या योजना लोकापर्यंत पोहोचाव्या यासाठी डाक विभागातर्फे
"रात्र शिबीर" आयोजित केले जात आहे. या शिबिरामध्ये डाक विभागाच्या विविध
योजनांची माहिती जनतेला देण्यात येऊन आर्थिक बचतीचे महत्व समजावून सांगण्यात येत आहे.
हि संकल्पना
संपूर्ण जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यासाठी डाक विभागाचे श्री. मोहन निकम, अधीक्षक
डाकघर, यवतमाळ विभाग यवतमाळ तसेच उपविभागीय डाक निरीक्षक, डाक अधिदर्शक, शाखा डाक पाल
हे विशेष परिश्रम घेत आहे.
Comments
Post a Comment