नवोदय विद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अंतिम मुदत ३०सप्टेंबर ;१० एप्रिलला प्रवेश परीक्षा
यवतमाळ, दि.11 (जिमाका) :घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इयत्ता अकरावीतील रिक्त जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ करिता ऑनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अकरावीच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार, १० एप्रिल २०२७ रोजी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये विद्यार्थी जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता दहावीत शिकत असणे आवश्यक आहे.संबंधित शाळा सीबीएसई किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा इतर कोणत्याही शासनमान्य शिक्षण मंडळाशी संलग्न असणे आवश्यक आहे.मागील वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत.
विद्यार्थ्याचा जन्म १ जून २०१० ते ३१ जुलै २०१२ या कालावधीत झालेला असणे आवश्यक आहे.जन्मतारखेची ही अट सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू आहे.तसेच विद्यार्थी सध्या भारतात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेला आणि भारतीय नागरिकत्व असलेला असणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा.प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि पात्रतेसंदर्भातील सविस्तर माहितीhttps://cbseitms.nic.in/
000000
Comments
Post a Comment