निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ अॅप ९ सप्टेंबरला कार्यशाळेचे आयोजन

 

यवतमाळ दि. 7 (जिमाका):  यवतमाळ कोषागारामधून निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाच्या सर्व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी ॲप कार्यान्वित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार, ९ सप्टेंबर  रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील  सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी कार्यशाळेस प्रत्यक्ष उपस्थित राहावे. ‘महा-उपलब्धी ॲप कार्यान्वित करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून घेण्यासाठी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे.

‘महा-उपलब्धीअॅपमध्ये हयातीचा दाखल्याची सुविधा

            ‘महा-उपलब्धी ॲपमध्ये हयातीच्या दाखल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी यवतमाळ कोषागारामधून निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी संबंधित बँकेमध्ये आपली ई-केवायसीची कार्यवाही २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित