अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी ५ सप्टेंबरला कार्यशाळा

 


यवतमाळ, दि.3 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना व वसतीगृह प्रवेशाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सर विश्वेश्वरया सभागृह, शासकीय तंत्रनिकेतन, धामणगाव रोड, यवतमाळ येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मंगला मून ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित