पुढिल दोन दिवस पाणीपुरवठा बंद

 

 

यवतमाळ दि. २४ : यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती अंतर्गत दर्डा नगर एमबीआर टाकीच्या व्हॉल्व्हचे मुख्य गेट पडल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे दर्डा मुख्य संतुलन टाकी अंतर्गत ७ उंच पाण्याच्या टाकीवरुन दर्डा नगर, बेले लेआऊट, वनवासी मारोती, सुयोग नगर-२. शिवाजी नगर, ग्राम पंचायत लोहारा  उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा पुढिल दोन दिवस उशिराने होईल.

तसेच वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी (एमबीआर) च्या स्लॅबचे लिकेज दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्यामुळे वाघापुर एमबीआर टाकी झोनअंतर्गत वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्नीक, चांदोरे नगर टाकी ९ उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा दि. 26 व 27 सप्टेंबर 2026 पर्यंत दोन दिवस पुर्णपणे बंद राहील.

तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित