बिजोत्पादन घटकासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदतवाढ

 

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ पोकरा अंतर्गत खरीप हंगामात हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादन बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व अर्थसहाय्यः

अनुदानाचे स्वरूपः हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खर्चाच्या 100 टक्के अर्थसहाय्य दिले जाते.

क्षेत्र मर्यादाः एका खातेदारास एका हंगामात कमाल 10 हेक्टर क्षेत्रापर्यंत जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये अनुदान अनुज्ञेय आहे.

समाविष्ट बाबीः पैदासकार, पायाभूत बियाण्याची खरेदी किंमत आणि बीज प्रमाणीकरण यंत्रणेने साथी पोर्टल नोंदणी, तपासणी आकारलेले शुल्क यांवर अनुदान दिले जाते.

अर्ज करण्याची पद्धत :

बिजोत्पादक शेतकऱ्यांनी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे साथी पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या 'महाविस्तार एआय' अॅपद्वारे किंवा प्रकल्पाच्या अधिकृत डीबीटी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

तरी बिजोत्पादक शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. ज्या बिजोत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी मुदत संपण्यापूर्वी प्रकल्पाच्या अधिकृत डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत. असे नोडल अधिकारी नितीन घाडगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित