टॉपक्लासशिक्षणयोजनेतीलअर्जांच्या पडताळणीसाठी१५सप्टेंबरपर्यंतमुदत

  


>पात्रविद्यार्थ्यांचेअर्ज पडताळूनफॉरवर्डकरण्याचेशाळांनाआवाहन

>इयत्ता ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांना ७५ हजार,

>तर ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये आर्थिक मदत

 

यवतमाळ, दि.9 (जिमाका) :ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या प्रधानमंत्री यशस्वी उपक्रमांअंतर्गत टॉप क्लास योजनेसाठी पात्र असणाऱ्या इयत्ता ९ वी ते १२ वी ततील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळून फॉरवर्ड करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचेसहाय्यक संचालक यांनी शाळांना केले आहे.

या योजनेंतर्गतजिल्ह्यातील टॉप क्लास शाळांच्या यादीमध्ये नमूद असलेल्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये इयत्ता९ वी ते १२ या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तसेच संबंधित विद्यार्थी ओबीसी, ईबीसी किंवा डीएनटी प्रवर्गातील असणे आणि त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणे या बाबी पडताळणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्गनिहाय आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५ हजार रुपये, तर इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक १ लाख २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते.या योजनेसाठी १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टत (एनएसपी) वर भरण्यात आले आहेत. अशा अर्जांची संबंधित शाळांकडूनपडताळणी करून ते शाळेच्या लॉगीनमधून फॉरवर्ड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळेकडून पडताळणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे.त्यामुळे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी निर्धारित मुदतीत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज फॉरवर्ड करून योजनेचा लाभ मिळवून द्यावा.पात्र विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील,असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याणयांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित