लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या कामांना येणार गती ; तातडीने कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

 



> जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विभागनिहाय आढावा

> निधी शंभर टक्के खर्च करण्याचेही दिले निर्देश

यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचित केलेली कामे तातडीने पूर्ण करा, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चा आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी पूनम आहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी २३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनी दिलेले निर्देश व सूचनांनुसार विविध विभागांच्या अनुपालन कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (सर्वसाधारण) २०२६-२७  या आर्थिक वर्षातील ऑगस्टअखेर खर्चाचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांबाबत सतर्क राहून समन्वयाने काम करावे, या सूचनांवर कार्यवाही करून कामे तातडीने पूर्ण करावीत व त्याचा अहवाल सादर करावा, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना गतीने प्रशासकीय मान्यता दिली जात असून विभागांनी प्रस्ताव तातडीने सादर करावे. यासोबतच नाविन्यपूर्ण  कामाचेही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कालमर्यादेत शंभर टक्के खर्च करावा. कोणत्याही विभागाचा निधी समार्पित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले. या आढावा बैठकीमुळे जिल्हा वार्षिक योजनेसह लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या कामांना गती येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित