पारधी समाजातील सुशिक्षितांना स्वयंरोजगारासाठी ५० हजारापर्यंत अर्थसहाय्य लाभार्थी निवड प्रक्रिया 17 सप्टेंबरला ; अर्जदारांना उपस्थित राहण्याचक आवाहन

 

 

यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा या कार्यालयांतर्गत समाविष्ट असलेल्या यवतमाळ, बाभुळगांव, कळंब, राळेगांव, मारेगांव, वणी, केळापूर, घाटंजी व झरी जामणी या ९ तालुक्यांतील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींकरिता विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

ही लाभार्थी निवड प्रक्रिया 17 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा, येथे आयोजित करण्यात येत आहे.

पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकयुवतींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य करणे या योजनेअंतर्गत ४० युनिटचे लक्षांक असून प्रति लाभार्थी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच  दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे या स्वयंरोजगारासाठी  ३८युनिटचे लक्षांक असून प्रति लाभार्थी ५० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 

या योजनेसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन पांढरकवडा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित