दारव्हा येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहासाठी भाडेतत्त्वावर इमारतीची आवश्यकता 5 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 

यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, दारव्हा येथे प्रवेशित विद्यार्थिनींची क्षमता १२५ असून, त्यांच्या सोयी-सुविधांसाठी सुमारे १० हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाची सुसज्ज इमारत भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक घरमालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसतिगृहासाठी आवश्यक असलेल्या इमारतीमध्ये बाथरूमसह संडासांची सुविधा, ग्रंथालय, विद्यार्थिनींसाठी अंदाजे ४० ते ४५ खोल्या, स्वयंपाकगृह, कार्यालय तसेच गृहपाल निवासासाठी स्वतंत्र क्वार्टर आदी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने इमारत चांगल्या व सुरक्षित परिसरात असणे अपेक्षित आहे.

इमारत भाड्याने देण्यास इच्छुक असलेल्या घरमालकांनी बांधकाम विभागाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या दरानुसार तसेच शासनाच्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून आपले अर्ज सादर करावेत.

इच्छुकांनी आपले अर्ज ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळत सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, जिरापूरे नगर, जहाज बिल्डिंग, दारव्हा येथे सादर करावेत, असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित