खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिशा समिती सभा
यवतमाळ, दि. 7 (जिमाका) : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची सभा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा कै. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ येथे होणार आहे. या सभेत केंद्र शासनाच्या विविध योजनांविषयी आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यवतमाळ यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment