भोसा येथील बाप्पा बाळ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’

 



       यवतमाळ, दि.23 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘लोकसंवाद व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत यवतमाळ तालुक्यातील भोसा येथील बाप्पा बाळ गणेशोत्सव मंडळ येथे जनजागृती कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या जनजागृती व आरोग्य शिबिराला नागरिकांनी प्रतिसाद देत शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच आरोग्याची तपासणी करुन आयुष्मान भारत योजना, महात्मा जोतिराव फुले जन आरेाग्य योजनेविषयी माहिती घेतली. या कार्यक्रमाला डॉ. प्रतीक्षा लाहोटे, सोनाली पाटील, योगिता राऊत, वृषाली दारबेश्वर, वैभव वनारसे, विजय राठोड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित