झरी जामणी येथे पथनाट्यातून योजनांची जनजागृती

 





यवतमाळ, दि. २३ : राज्य शासनाच्या  सेवा संकल्प अभियान व पोषण अभियानाअंतर्गत महिला व बालविकास विभाग आणि केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने झरी जामणी पंचायत समिती परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पथनाट्याच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास योजनेसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सोप्या व प्रभावी भाषेत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.


कार्यक्रमा दरम्यान कलावंतांनी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि नाट्याचे सादरीकरण याद्वारे कुपोषण निर्मूलन, पोषण आहाराचे महत्त्व, तसेच महिला व बालकांच्या आरोग्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.


या जनजागृती कार्यक्रमाला परिसरातील महिला नागरिक, माता, तसेच झरी जामणी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित