सेवा संकल्प अभियानांतर्गत पुसदमध्ये रक्तदान व रोग निदान शिबीर

 

              यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कार्यकाळानिमित्त राज्य शासनामार्फत १७ सप्टेंबरपासून राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत पुसद येथील पार्वतीच्या बाळा गणेश मंडळ,  मेडिकेयर हॉस्पिटल आणि रुग्ण मित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर व रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन नायब तहसिलदार माया ढोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, मेडिकेयर हॉस्पिटले आरोग्य कर्मचारी, रुग्ण मित्र फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित