तांत्रिक अडचणीमुळे दोन दिवस पाणी पुरवठा बंद
यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : यवतमाळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती अंतर्गत वाघापुर टेकडी मुख्य संतुलन टाकी झोन अंतर्गत वैभव नगर, वाघापुर टेकडी, प्रिया रेसिडेन्सी, मेडीकल टाकी, विठ्ठलवाडी, बालाजी टाकी, विसावा टाकी, पॉलिटेक्नीक, चांदोरे नगर टाकी या ९ उंच पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा मुख्य पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे व वाघापुर येथील एमबीआर चे स्लॅबचे लिकेज दुरुस्तीचे कामामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आज दि. 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर दोन दिवस पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहील. तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाव्दारे आवाहन करण्यात आले आहे.
000
Comments
Post a Comment