जात वैधता प्रमाणपत्रासाठी २८ सप्टेंबरपासून शिबीर


सेवा संकल्प अभियान : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत आयोजन

यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :  राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्ग, विशेष मागासवर्ग (मराठा) या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २८ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत समितीच्या कार्यालयात होणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आरक्षित प्रवर्गातून व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. शासनाने विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यापासून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरणे सादर केलेल्या, मात्र प्रकरणातील त्रुटींमुळे अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकरणातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय स्वतः किंवा पालकांमार्फत समितीसमोर उपस्थित राहता येईल. अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घेवून आपल्या प्रकरणातील त्रुटींची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित