‘आरोग्याचा श्रीगणेशा’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी

 


> लोकसंवादातून शासकीय योजनांची जनजागृती

       यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : गणेशोत्सवानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, कृष्णा ऑर्थोपेडिक केअर आणि श्रीराम गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोकसंवाद आणि  ‘आरोग्याचा श्रीगणेशा उपक्रमांतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.

हे शिबीर यवतमाळ शहरातील माईंदे चौक येथील श्रीराम गणेश उत्सव मंडळ घेण्यात आले. या शिबिरात नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ईसीजी व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान केल्यानंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय राठोड,  श्रीराम गणेश उत्सव मंडळचे अध्यक्ष अभिजित पायेकर, डॉ. अतुल पाटील, आरोग्य मित्र पवन वारे, प्रिया घोडमारे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजना, आरोग्यविषयक जनजागृती, नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित