पांढुर्णा येथे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमातून कृषी योजनांविषयी मार्गदर्शन
> नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
यवतमाळ,
दि.
१८ : राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियान आणि लोकसंवाद अभियानांतर्गत श्री वसंतराव
नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, यवतमाळ, जिल्हा माहिती
कार्यालय आणि सेवा गणेश मंडळ, पांढुर्णा यांच्या
संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दारव्हा तालुक्यातील पांढुर्णा येथे ‘लोकसंवाद’ कार्यक्रम तसेच
आरोग्याचा श्रीगणेशा उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात
आले.
हा कार्यक्रम श्री वसंतराव नाईक शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत ऊईके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे आणि जिल्हा
माहिती अधिकारी पवन राठोड, यांच्या
मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला पांढुर्णा येथील सरपंच रत्नदिप
पवार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. महेश
चव्हाण, आत्मा प्रकल्प दारव्हाचे
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जीवन जाधव,
जिल्हा
माहिती कार्यालयाचे विजय राठोड, सामाजिक कार्यकर्ते
पंजाब जाधव, गजानन गुल्हाने, सुधीर चीरडे,
मोहन
ठाकरे, विनोद भोयर, रमेश जाधव, पुंडलिक राठोड, नरेश आडे, रोहित राठोड, गणेश राठोड, उमेश पवार, प्रवीण पवार,
सुभाष
जाधव, सुजित पवार, संजय राठोड, केवल पवार, सुमित पवार, आर्यन पवार
यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. तसेच
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
यवतमाळ येथील औषध वैद्यकीय शास्त्र विभागाचे सागर तगड पल्लीवार, नेत्र विभागचे डॉ. आरती कदम,डॉ. इस्माईल शेख, बालरोग विभागाचे डॉ.
अनुष्का बाहेती, स्त्रीरोग व
प्रसूती शास्त्राचे डॉ.नेहल अग्रवाल यांनी सहभाग घेतला होता.
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, सर्दी-खोकला, ताप, शस्त्रक्रिया, पोटाचे आजार, हर्निया, शरीरावरील गाठी, स्त्रीरोग, नेत्ररोग तसेच नाक-कान-घसा आदी आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी व मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. महेश चव्हाण यांनी अस्थिरोगासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जीवन जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, त्यासाठीची पात्रता आणि योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सेवा गणेश मंडळ, पांढुर्णा यांच्या वतीने उपस्थित मान्यवर, डॉक्टर, अधिकारी आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले.




Comments
Post a Comment