प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना टूलकिट व प्रमाणपत्र वाटप
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ
यवतमाळ,दि.१८ : पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ॲाक्टोबर या
कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी विकास
मीना यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१७) रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य
सन्मान योजना लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह
आयोजित या मेळाव्यास जिल्हा अग्रणी प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, नाबार्डचे जिल्हा समन्वयक अतुल इंगळे, तज्ञ संचालक सुनील संदुरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक इंगळे, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर तसेच अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते लाभार्थ्यांना टूलकिट व
प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


Comments
Post a Comment