प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिवरा बारसा येथे आरोग्य तपासणी शिबीर
सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन
यवतमाळ,
दि. 24 (जिमाका) : राज्य शासनाच्या
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘श्रीगणेश आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत
प्राथमिक
आरोग्य उपकेंद्र हिवरा बारसा गाव कुंडी येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात
तज्ज्ञ डॉक्टरांनी गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन मार्गदर्शन केले. यात नागरिकांची
रक्तदाब, मधुमेह, रक्तगट तपासणी करुन आवश्यक औषधोपचार करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत
जनआरोग्य योजनेविषयी माहिती देण्यात आली.
हे शिबीर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले असून शिबिराला आरोग्य अधिकारी,
डॉक्टर्स, परिसरातील नागरिक उपस्थित होते


Comments
Post a Comment