दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात १३ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया


> सेवा संकल्प अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन


यवतमाळ, दि. २३ : राज्य शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य विभागाच्या पथकाने १३ महिलांवर यशस्वीरीत्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.


 तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या टीमने शस्त्रक्रिया प्रक्रियेत सहभाग घेतला. शिबिरादरम्यान महिलांची आवश्यक तपासणी करून त्यांना कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा लाभ महिलांना मिळत असून कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीसही यामुळे चालना मिळत आहे.


शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

0000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित