आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता

यवतमाळमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारतीची आवश्यकता असून ४० खोल्यांची स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर देण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नवीन इमारतीसाठी अपेक्षित सुविधा असाव्यात विद्यार्थ्यांना पुरेल इतक्या ४० खोल्या, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, १५ स्नानगृहे व १५ शौचालयांची सोय, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा, पुरेशी विद्युत व्यवस्था असणे आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा असे गृहपाल, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. १, यवतमाळ यांनी कळविले आहे

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती