यवतमाळमधील कृष्णकुंज नगरात सावकारी पथकाची धाड ७ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी पथकाने कृष्णकुंज नगर, आमराई, वडगाव रोड, यवतमाळ येथील वाय. पी. परळीकर यांच्या निवासस्थानी झडती कारवाई केली. या कारवाईदरम्यान ७ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले.
अशोक उत्तमराव दिघाडे यांनी २२ जून रोजी परळीकर हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पडताळणी करण्यासाठी सावकारी पथकाने २५ जून रोजी झडती घेतली. कारवाईदरम्यान घरातून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय समन्वय समिती दिली.
कारवाईसाठी सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक रिता बाळकृष्ण निनावे यांच्या नियोजनानुसार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पथकात व्ही. के. हिरूळकर सहाय्यक निबंधक, दारव्हा, एस. डब्ल्यू. खरतडे,रोशन गाडे, विद्या भोवते, के. एस. मारसट्टीवार,अनिल मामीडवार,पी.एन.चव्हाण, तसेच तलाठी आकाश दर्शनवार यांचा समावेश होता. पोलीस प्रशासनातील पी.एस.आय. यु. के. परांडे, आर. बी. गुजर, पी. बी. राठोड तसेच व्हिडीओ फोटोग्राफर यांनीही सहभाग नोंदविला.
संयुक्त कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख,पोलीस निरीक्षक अजित कदम, तथा तालुकास्तरीय प्रशासकीय समिती यांचे मार्गदर्शनात सहकार विभाग, महसूल विभाग, आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment