फार्मर्स ग्रुप लीग स्पर्धेत 503 शेतकरी गटांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तथा प्रकल्प संचालक आत्मा, यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकरी गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “फार्मर्स ग्रुप लीग या नाविन्यपूर्ण स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 10 जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण 503 शेतकरी गट आणि त्यांचे 5 हजार 957 सक्रिय सभासद यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक सहभाग उमरखेड तालुक्यातून नोंदविण्यात आला असून येथील 91 गावांमधील 91 शेतकरी गटांच्या 1 हजार 5 शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यानंतर कळंब तालुक्यातील 76 शेतकरी गटांच्या 877 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सदर स्पर्धा 10 जून ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून सहभागी शेतकरी गट व सदस्यांना विविध टप्प्यांमध्ये दिले जाणारे टास्क आणि अॅक्टिव्हिटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पूर्ण केलेल्या कामांचे व्हिडिओ व छायाचित्रे जतन करून निरीक्षकांना करुन दयावयाचे आहे. विविध उपक्रम देण्यात आले आहेत. यामध्ये मृदा चाचणी, बियाणे उगवण चाचणी, बीज प्रक्रिया, सेंद्रिय खतांचा वापर, बीबीएफवर पेरणी, सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब, सापळा पिके, आंतरपीक पद्धती, जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णाक, निमास्त्र, फेरोमोन सापळे, ट्रायकोकार्ड व चिकट सापळे, पक्षीथांबे उभारणी, शेतीशाळा, जलतारा व रिचार्ज पीट निर्मिती, शिवारफेरी तसेच शेती दिनातील सहभाग यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. स्पर्धेदरम्यान करण्यात आलेल्या कामांचे दर आठवड्याला मूल्यांकन करण्यात येणार असून अंतिम मूल्यांकन 10 ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत होईल. त्यानंतर तालुकास्तर व जिल्हास्तराचे निकाल 14 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्या शेतकरी गटांचा व सदस्यांचा 15 ऑगस्ट रोजी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रकल्प उपसंचालक आत्मा यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती