सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प

 22 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दि. 6 जून रोजी जिल्ह्यात भव्य ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅम्प केवळ एका ठिकाणी न होता जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व 22 शाखांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे. शेती आणि पूरक व्यवसायांना चालना देणाऱ्या विविध शासकीय व बँक योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी), कृषी पायाभूत सुविधा निधी, ग्रामीण गोदाम भंडारण, कोल्ड स्टोरेज (शीतगृह) तसेच महिला बचत यांसारख्या शासकीय व बँक योजनांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून जागेवरच मंजुरीपत्र देण्यात येणार असून थेट कर्जवाटपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी मेळावा जिल्ह्यातील शेतकरी, कृषी उद्योजक आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी आपल्या जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत उपस्थित राहून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळचे अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित