विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणूक-2026 प्रक्रियेअंतर्गत यवतमाळ मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल घोषित केल्यानंतर जिल्ह्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने 5 जून 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल घोषित झाले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असून, निवडणूक निर्बंध हटले आहेत. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देवून सूचित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती