विशेष वृत्त : राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी, प्रादेशिक व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ
राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' सुरू केली असून, ही योजना शेतकऱ्यांनी विविध बँका व सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जांस लागू करण्यात आली आहे.
या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध बँकिंग व सहकारी संस्थांमधून कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेचा लाभ मिळण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार असून, शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment