अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी जिल्हा संसाधन व्यक्तीची निवड होणार शिफारशींकरिता निकष जारी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सन 2026-27 करीता जिल्हा संसाधन व्यक्तीची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाच्या शिफारशींकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने निकष जारी केले आहे. शैक्षणिक पात्रता अर्जदारांकडे विद्यापीठ यांचेकडील अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर/ पदवी किंवा कृषी व कृषीसंबंधित पदव्युत्तर/पदवी किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवी ई. पात्रता असणे आवश्यक आहे. ‘यांना’ प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेत सेवानिवृत्त बँक/शासकीय अधिकारी, सनदी लेखापाल, सल्लागार संस्था, बँक मित्र, वैयक्तिक व्यावसायिक व्यक्ती, विमा प्रतिनिधी, अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर/ पदवी व इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर/पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अनुभव आवश्यक अन्न प्रक्रिया किंवा कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकांकडे कर्ज प्रस्ताव सादर करणे अथवा तत्सम क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सिंचन चौक, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित