एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयारीला वेग!

सूचना व अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन जिल्हयातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करीत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणाम कारक व्हावे यासाठी जिल्हयातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. एकल महिलांच्या केवळ समस्या मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनाने कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणत्या नव्या योजना सुरू कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत तसेच कायदे किंवा नियमांमध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात याबाबत सविस्तर सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सूचना पाठविताना केवळ मतप्रदर्शन न करता संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी, अंमलबजावणीची पद्धत आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, समाजातील एकल महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण निर्मिती प्रक्रियेत सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सूचना व अभिप्राय व्हॉट्सअॅपवरही नोंदवता येणार एकल महिला धोरणाबाबतच्या सूचना व अभिप्राय पाठविण्यासाठी शासनाने अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक ८२०८५८९१९५ उपलब्ध करून दिला आहे. जिल्हयातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती