सहकारी आदिवासी विकास महामंडळांतर्गत ट्रक वाहनांचा ई-लिलाव
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यवतमाळ कार्यालयाअंतर्गत ट्रक वाहने ई-लिलावात विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. या वाहनाची विक्री एनईएमएल या पोर्टलवर दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 11 ते 5 या वेळेत ई-लिलावाद्वारे करण्यात येणार आहे. हा लिलाव आदिवासी भागातील सुशिक्षित बेरोजगार अवजड परवानाधारकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
या ई-लिलावात ट्रक क्रमांक एमएच १५ ईजी २०३१/३२/३३/३४ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार रुपये असलेली ही वाहने ई-लिलावात विक्रीस ठेवण्यात येणार आहेत.
या लिलावाच्या अटी व शर्तीनुसार ई-लिलावामध्ये जे आदिवासी बांधव सहभागी होतील अशा बांधवांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे अनिवार्य राहील. वाहने विक्री केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करुनच वाहने हस्तांतरित करण्यात येतील. तसेच वाहन ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत घ्यावे लागेल. अंतिम बोली मंजुर वा नामंजुर करण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक व्यवस्थापक यवतमाळ यांनी राखुन ठेवलेला आहे. लिलावाशी संबंधित सर्व बाबतीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचा अंतिम निर्णय बंधनकारक राहील. सदर ई- लिलावावातील इतर अटी-शर्ती www.market.neml.in या एनईएमएलच्या पोर्टलवर उपलब्ध केल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी राजरतन बागडे (८४२१५४९८४२), संदेश वर्मा (९३२५४४०६३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक बालाप्रसाद बरकमकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment